CM Vayoshri Yojana : ‘लाडक्या बहिणी’नंतर आता कोणाला मिळणार 3 हजार रूपये?
25 Aug, 2024

*मुख्यमंत्री वयोश्री आर्थिक सहायता योजना फॉर्म भरणे सुरू*
महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत एकरकमी 3000/- हजार रुपये सरकार कडून थेट DBT माध्यमातून खात्यामध्ये जमा केले जात आहे.
*योजनेसाठी लागणारे कागदपत्रे*
1) आधार कार्ड
2) पासपोर्ट फोटो 2
3) बँक पासबुक
4) स्वयघोषणापत्रा
5) राशन कार्ड
6) उत्पन्न दाखला
7) फिटनेस सर्टिफिकेट
आता लाडकी बहीण योजनेनतंर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार आहे. तर मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करून योजनेला गती देणार असल्याची माहिती मिळत आहे. ही योजना जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांमार्फत राबवली जाणार आहे. लाभार्थी जेष्ठ नागरिकांना या योजनेमार्फत ३ हजार रूपये मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते. पात्र लाभार्थ्यांना ३ हजार रुपये बँक खात्यात पैसे जमा केले जातात. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्जदाराकडे आधारकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याची पासबूक झेरॉक्स, स्वयं घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटवण्यासटी विहीत केलेली अन्य कागदपत्रे पुरावा म्हणून आवश्यक आहेत.